कुडाळ तालुका भंडारी मंडळ आणि जिल्हाभंडारी महासंघाची रमण वायंगणकर,गजानन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न..

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भंडारी समाजाच्या सर्व नागरसेवकांचे भंडारी समाजच्या वतीने करणयात आले सत्कार..

कुडाळ /- समिल जळवी.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आणि कुडाळ तालुका भंडारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी दिनांक ६ मार्च रोजी सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशनरोड कुडाळ येथे भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर आणि कुडाळ भंडारी तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाचे पदाधिकारी आणि कुडाळ तालुक्यातील भंडारी मंडळ आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यासभेत मागील बैठकीतील ईतिवृत्त वाचन करून सुरुवात करण्यात आली.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी सांगितले की कालच आमची कुडाळ येथील विश्रामगृहावर ओबीसी विषयी महत्वाची बैठक झाली यामध्ये असे ठरले की, ७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन ओबीसीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी भंडारी समाजाचा पुर्णपणे पाठिंबा असेल यासाठी भंडारी समाज बांधवांनी पक्षीय पादत्राणे बाहेर ठेऊन भाग घ्यावा आणि एकत्रित लढा दयावा,वेळप्रसंगी पक्षाच्या पदांचा त्याग करून ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवून शैक्षणिक क्षेत्र ,निवडणूक ,नोकरीत, पदोन्ननती यासारखे सर्व पूर्वीसारखे परत मिळविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया असे रमण वायंगणकर यांनी सांगितले.

कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की,भंडारी समाज आणि ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षण मधून बेदखल केले गेले आहे.ओबीसी जाती मद्धे भंडारी समाज मोठा आहे,राजकीय आरक्ष कमी केल्याने ते पुढील निवडणुकीत आरक्षण मिळण्यासाठी भंडारी समाजाने एकत्र येऊन हा आरक्षणाचा लढा लढणे गरजेचे आहे,असे कुडाळ तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांनी बोलताना सांगितले.

यानंतर कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भंडारी नगरसेवकांचे महासंघाच्या वतीने शाल ,नारळ ,पुष्पगुच्छ देऊन भंडारी समाजाच्या नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले.यात नगरसेविका सौ.श्रेया शेखर गवंडे ,नगरसेविका कु.चांदणी कांबळी , नगरसेविका सौ.जोती जळवी ,या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.आणि दोडामार्ग येथील महासंघाचे उपाध्यक्ष सीताराम खडपकर यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.भंडारी समाजाच्या चारही भंडारी नगरसेवकांनी सत्कार केल्यानंतर समाजाचे आभार मानले.

यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर ,सचिव विकास वैद्य ,कुडाळ भंडारी तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर,अतुल बंगे ,जयप्रकाश चमणकर ,समील जळवी ,राजू गवंडे ,सीताराम खडपकर ,दिवाकर मावळणकर ,सुनील नाईक ,प्रदीप मुणगेकर ,लक्ष्मीकांत मुंडीये ,हेमंत करंगुटकर ,मनोहर पालयेकर ,श्रीकांत वेंगुर्लेकर ,संदीप साळसकर ,शरद पावसकर ,प्रकाश पावसकर ,दर्शन कुडव ,नमिता पावसकर ,भारत आळवे ,नागेश करलकर ,मंगेश बांदेकर,आनंद नवार यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे आणि कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा सदस्य तालुका सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page