You are currently viewing आरवली येथे १६ व २६ मार्च रोजी मोफत मधुमेह चिकित्सा शिबीर

आरवली येथे १६ व २६ मार्च रोजी मोफत मधुमेह चिकित्सा शिबीर

वेंगुर्ला /-


श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.दि.१६ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे.त्यानंतर दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वा.ते सायंकाळी ४ वा.या वेळेत तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची तपासणी,निदान व वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे.या शिबिरास मिरज येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ.मिलिंद पटवर्धन यांच्यासह तेथील तज्ञ डॉकटर तसेच जिल्ह्यातील तज्ञ डॉकटरांच्या सहकार्याने रुग्णांची तपासणी करुन योग्य तो वैद्यकीय सल्ला देणार आहेत.त्यांनतर मधुमेही रुग्णांना डॉ. मिलिंद पटवर्धन हे आहार,व्यायाम व जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.ज्या रुग्णांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी र.ग.खटखटे ग्रंथालय शिरोडा येथे दि.८ मार्च ते दि.१४ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये नावनोंदणी करावी.तसेच
अधिक माहितीसाठी श्री देव वेतोबा देवस्थान येथे संपर्क साधावा.या शिबिरामध्ये फक्त १०० रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय व आनंद सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर मंत्री यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..