You are currently viewing मनसेचे आमदार राजू पाटील यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी केले सिंधुदुर्ग विमानतळावर स्वागत.

मनसेचे आमदार राजू पाटील यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी केले सिंधुदुर्ग विमानतळावर स्वागत.

मालवण /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदादा पाटील यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले.आई भराडी देवीच्या दर्शनासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मालवण शहर या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

आंगणे कुटुंबीय यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आई भराडी देवीच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली कोरोनाचा संकट राज्यावरच टळू दे. सर्वांना सुखी ठेव , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व राज साहेबांच्या कुटुंबियाच्या वतीने भराडी देवीच्या दर्शनाला सर्व भाविकांचे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून स्वागत करतो, मुंबई महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा रोऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी आई भराडी देवी चरणी केली .यावेळी मनसेचे महाराष्ट्र सचिव सचिन मोरे, चेतन पेडणेकर, रवी निगुडकर, सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मालवण तालुकाअध्यक्ष विनोद सांडव, माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, राकेश परब, प्रशांत निरवडेकर, पाँसकॉल रोड्रिक्स, विशाल माडये, विल्सन गिरकर, अमित इब्राहिमपुरकर, विद्यार्थी सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष विनायक गावडे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..