ओरोस /-
शिवसेना ओरोस विभाग प्रमुख आणि दत्तराज ॲम्बुलन्स सव्हिर्सेस चे मालक नागेश ओरोसकर यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी आणली असून या अत्याधुनिक व्हेंटिलेटर युक्त सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज शासकीय मेडिकल कॉलेज येथे खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रसंगी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रकाश जैतापकर, सरपंच प्रिती देसाई, रुची राऊत, रोशन परब आदी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तराज ॲम्बुलन्स चे मालक नागेश ओरोसकर यांच्या माध्यमातून ही अत्याधुनिक रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी अत्यल्प दरात जनसेवेसाठी दाखल करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा पद्धतीची वैयक्तिक मालकीची ही पहिलीच रुग्णवाहिका असून या रुग्णवाहिका मुळे जिल्ह्यातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याची माहिती यावेळी नागेश ओरसकर यांनी दिली