You are currently viewing कुडाळ नगरपंच्यायत नगराध्यक्ष निवडीनंतर भाजपचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह माजी नगरसेवक नाराज.

कुडाळ नगरपंच्यायत नगराध्यक्ष निवडीनंतर भाजपचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह माजी नगरसेवक नाराज.

कुडाळ /- समिल जळवी.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राणेंचे विश्वासू शिलेदार ओंकार सुधीर तेली हे नाराज असल्याचे समजते.तेली यांच्यासह कुडाळ नगर पंचायत चे भाजपचे माजी नगरसेवक व माजी नगरसेविका देखील नाराज असल्याची कुजबुज कुडाळ शहरात जोरदार सुरू आहे.ओंकार तेली यांनी आपल्या अडीच वर्षे नगराध्यक्षच्या कालावधीत अतिशय चांगले काम केले.ओंकार तेली यांना मानणारा मित्र परिवार मोठा आहे,कुडाळ शहरातील लोक ओंकार तेली यांचे आजही नाव काढतात.नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी टाकलेली जबाबदारी तेली यांनी चांगली पार पाडली,आपल्या भैरववाडी वॉर्ड मधील भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणले तसेच कुडाळ शहरातील ईतर दोन वॉर्ड मद्धे लक्ष घालून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणले.कुडाळ ननगरपंचायत निवडणुकी नंतर भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली उपस्थित नव्हते कुडाळ मद्धे राणेसाहेब आल्यानंतर देखील ते राणेंच्या भेटीला आले नाहीत.भाजपचे ओंकार तेली व माजी नगरसेवक यांनी जर एकाच वेळी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर भाजपला मोठा राजकिय फटका बसू शकतो अशी चर्चा देखील कुडाळ शहरात जोरदार सुरू आहे.

कुडाळ शहरात कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडीनंतर भारतीय जनता पक्षात नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसून येत आहे.कुडाळ शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगले काम केले म्हणूनच भाजप पक्ष कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत ८ जागा निवडून नंबर १ चा पक्ष ठरला आणि शिवसेनेने आपल्या ७ जागा जिंकून नंबर २ चा पक्ष ठरला आहे.तर काँग्रेस पक्ष नंबर ३ चा पक्ष ठरला आहे.मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कुडाळ नगरपंचायत मद्धे महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बसला आहे.

भाजपमद्धे असलेल्या अंतर्गत वादामुळे काही भाजपचे कार्यकर्ते हे भाजप कार्यालयात जाणे देखील टाळू लागले आहेत.काही भाजप कार्यकर्ते हे नगरपंचायत निवडणुकी नंतर भाजपच्या कार्यालयात देखील फिरकले नाहीत,ही नाराजी काही भाजपचे कार्यकर्ते उघडपणे बोलून देखील दाखवत आहे.भाजपचे माजी नगराध्यक्ष,नगरसेवक कोणावर आहेत नाराज ? का आहेत नाराज ? ही नाराजी भाजपचे वरीष्ठ नेते दूर करण्यात यशस्वी होतील का ? की, या नाराजीचा फायदा शिवसेना किंवा काँग्रेस पक्षाला होईल का ? ते पुढे येणारा काळच ठरवेल.

या भाजपच्या नाराजीचा फटका भाजपच्या संघटनात्मक वाढीवर होणार आहे हे मात्र खरं आहे.भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांनमध्ये भाजप पक्षावर या नाराजीचा मोठा परिणाम होऊ शकतो.भाजपमधील या नाराज माजी नगराध्यक्ष,माजी नगरसेवकांना आमदार वैभव नाईक शिवसेनेत घेण्यास यशस्वी ठरतील ? की , काँगेसचे अभय शिरसाट नाराजांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतील का? हे लवकरच समजेल,त्यामुळे येणाऱ्या काळत नाराज भाजप कार्यकर्ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतील हे सांगता येणार नाही.

अभिप्राय द्या..