वेंगुर्ला /

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला.रात्रौ उशिरापर्यंत मुख्य रस्त्यापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी जगभर ख्याती पावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील  श्री गणपती मंदिर येथे सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.तालुक्यासह,शहर,ग्रामीण भाग,तसेच मुंबई,गोवा व अन्य भागातून भाविक गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.यावेळी पूजा, श्री सत्यनारायण महापूजा,केळी, नारळ ठेवणे,नवस फेडणे आदींसह रात्री श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक संपन्न झाले.श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा वाघेश्वरवाडी व ग्रामस्थ यांच्या सुयोग्य नियोजनामुळे हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page