You are currently viewing कुडाळ तालुका काँग्रेसच्या बैठकित कुडाळ पंचायत समितीवर तिरंगा फडण्यासाठी सज्ज होऊया एकमुखी ठराव.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या बैठकित कुडाळ पंचायत समितीवर तिरंगा फडण्यासाठी सज्ज होऊया एकमुखी ठराव.

कुडाळ /-


कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ,प्रकाश जैतापकर जिल्हा सरचिटणीस, चंद्रशेखर जोशी जिल्हा सरचिटणीस, विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, अभय शिरसाठ तालुका काँग्रेस अध्यक्ष, प्रसाद जी बांदेकर जिल्हा बँक संचालक सुंदर वल्ली स्वामी महिला तालुका अध्यक्ष, सुंदर सावंत शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
गानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर ,गायक बप्पी लहरी, मराठी नाट्य व सिने कलाकार रमेश देव ,कोकणातील दशावतार नाटकाला ग्लॅमर प्राप्त करून देणारे सुधीर कलिंगण, यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदी सौ आफ्रीनताई करोल व महिला बालकल्याण सभापतिपदी सौ अक्षताताई खटावकर यांची निवड झाल्याबद्दल व नगराध्यक्ष पदावर विराजमान करण्याची महत्त्वाची भूमिका निभावणारे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस संपर्कमंत्री सतेजजी पाटील साहेब तसेच कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत विजयी व पराभूत सर्व उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. व आफ्रीनताई करोल यांचा सत्कार बाळासाहेब गावडे जिल्हाध्यक्ष व अक्षताताई खटावकर यांचा सत्कार ज्येष्ठ काँग्रेसमन सावंत गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला
आज माजी आमदार पुष्पसेन सावंत व काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा मुंज असते तर कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसचा नगराध्यक्ष बघून त्यांना आनंद झाला असता.
कुडाळ नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचा विजय, स्वर्गवासी आबासाहेब मुंज यांना समर्पित करण्यात ठराव चंद्रशेखर जोशी यांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी शनिवार-रविवार जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघ हवाई दौरा करण्याचे ठरविण्यात आले व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक सामाजिक उपक्रम राबवून जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी खास प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
कुडाळ मधील माणगाव, तेर्सेबांबर्डे मांडकुली, या नवीन पुलाच्या भूमिपूजनासाठी तसेच पिंगुळी मानकूली रस्त्यावर खोडदेश्वर मंदिर येथे झालेल्या पुलाच्या उद्घाटनासाठी व अंजीवडे घाट ,सोनवडे घाट या कामांसाठी राज्याचे बांधकाम मंत्री नामदार अशोकजी चव्हाण यांच्या हस्ते करण्याचे ठरविण्यात आले.
कुडाळ नगरपंचायत व तालुक्यातील विकास कामांसाठी नामदार सतेजजी पाटील यांच्या माध्यमातून विविध खात्यातून जास्तीत जास्त विकास निधी आणून शहराचा व तालुक्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले . यासाठी आमदार सतेजजी पाटीलसाहेब यांची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भेट घेण्याचे ठरविण्यात आले.
कुडाळ शहर महिला अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून शेख यांची निवड करण्यात आली
मुंबई-गोवा महामार्गावर मिडल कट, सर्विस रोड ,सर्कल, काही ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाच्या मागणीसाठी मार्च च्या दुसऱ्या आठवड्यात महामार्गावर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुका काँग्रेसचा विजयी निर्धार मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले हा मेळावा भव्य-दिव्य करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस ज्येष्ठ काँग्रेसमन सावंत गुरुजी,तबरज शेख, तोसिफ शेख ,चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, सोनाल सावंत, शुभांगी काळसेकर, रंजना जळवी पूजा पेडणेकर ,पांडू खोचरे ,मंगेश पार्सेकर, मयूर शारबिद्रे, उल्हास शिरसाट, संजय पालव अजीम शेख, बक्तावर मुजावर ,आयुब खुल्ली, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..