You are currently viewing बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली अर्पण..

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली अर्पण..

कुडाळ /-

“कृषी मित्र शेतकरी माजी आमदार,अंगभूत धाडस, दिलदारपणा, स्पष्टवक्तेपणा असलेले, शेतीमध्ये ,गुराढोरांमध्ये रमणारे लोकनेते म्हणजे पुष्पसेन सावंत होय”. असे उद्गार प्रा‌.अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या आमदार पुष्पसेन सावंत यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “बॅ नाथ पै शिक्षण संस्था ज्यांच्या शैक्षणिक – सामाजिक कार्याचा, विचारांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करीत आहे अशा अनेक वंदनीय व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे पुष्पसेन सावंत होय. असे सांगत संस्थेच्या स्थापनेमध्ये पुष्पसेन सावंत यांचे असलेले योगदान, पाठिंबा, सहकार्य व मार्गदर्शन हे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला नेहमीच प्रेरणादायी ठरलेले होते. त्यांच्या विचारांचा आदर्श आपण समोर ठेवून कार्य करूया .अशा शब्दात त्यांचा गौरव करून उपस्थितांच्यासमवेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी,प्रा. शांभवी मार्गी,सी.बी.एस.ई.सेंट्रल स्कूल च्या प्राचार्या शुभांगी लोकरे, मीनल ठाकूर, पांडुरंग पाटकर ,किरण सावंत, किरण करंदीकर, प्रन्वी हरमलकर, प्रसाद कानडे व विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..