You are currently viewing दोडामार्ग न.प.च्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रा.सीताराम खडपकर व जेष्ठ पदाधिकारी पांडुरंग बोर्डेकर यांची निवड.

दोडामार्ग न.प.च्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रा.सीताराम खडपकर व जेष्ठ पदाधिकारी पांडुरंग बोर्डेकर यांची निवड.

दोडामार्ग /-

.

दोडामार्ग नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी आज शुक्रवारी पार पडल्या. या निवडीमध्ये विषय समिती सभापती पदावर भाजपचे सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. सभापती पदाच्या निवडी पीठासीन अधिकारी प्रशांत पानवेलकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडल्या. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती रमाकांत जाधव,उपसभापतीपदी क्राती महादेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम, समिती सभापतीपद नितीन मणेरीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदी गौरी पार्सेकर यांची निवड झाली आहे. पाणी पुरवठा व बाजार समिती सभापतीपदी देवीदास गवस यांची निवड झाली आहे.

दोडामार्ग नगर पंचायतीवर भाजपाची एक हाती सत्ता आहे. या नगरपंचायतीत भाजपाचे 14 नगरसेवक, शिवसेनेचे 2 नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे. समिती सदस्य निवडीत शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष देविदास गवस गटनेते नितीन मणेरीकर नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, स्वराली गवस गौरी पार्सेकर, संजना म्हावळकर, सुकन्या पनवेलकर, ज्योती जाधव क्राती जाधव, आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रा सीताराम खडपकर, पांडुरंग बोर्डेकर व नूतन सभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

विषय समिती सभापती

बांधकाम समिती सभापती नितीन मणेरीकर, सदस्य रामचंद्र व स्वराली गवस ,शिक्षण व आरोग्य समिती सभापती गौरी पार्सेकर, सदस्य संजना म्हावळणकर व सुकन्या पनवेलकर
,महिला व बालकल्याण समिती

सभापती ज्योती जाधव, उपसभापती क्रांती जाधव, सदस्य सुकन्या पनवेलकर,पाणीपुरवठा व बाजार समिती ,- सभापती देविदास गवस(उपनगराध्यक्ष), सदस्य रामचंद्र मणेरीकर व संजना म्हावळणकर स्थायी समिती,- सभापती चेतन चव्हाण, सदस्य देविदास गवस, नितीन मणेरिकर, गौरी – पार्सेकर, ज्योती जाधव. या सर्व नूतन सभापती व सदस्यांचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सेनेचे दोन सदस्य असून विरोधी सदस्य पदे रिक्त कसई नगरपंचायत निवडणूकित सेनेला दोन जागा मिळूनही गट स्थापन केला नाही व आज नगरपंचायतिच्या कमिटी गठीत करताना प्रतिनिधित्व विरोधी गटाकडून सदस्य पदासाठी नामनिदेशन दाखल न केल्याने सर्व गठीत समितीच्या सदस्य पदी एक जागा रिक्त असल्याचे मुख्याधीकारी शिवराज गायकवाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा