You are currently viewing कुडाळ नगरपंचायत विषय समित्यांचे सभापती जाहीर.;सौ.श्रेया गवंडे यांना बांधकाम पर्यटन सभापती.

कुडाळ नगरपंचायत विषय समित्यांचे सभापती जाहीर.;सौ.श्रेया गवंडे यांना बांधकाम पर्यटन सभापती.

कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीनंतर आज १८ फेब्रुवारी रोजी विषय समिती सभापती निवड करण्यात आल्या.आणि स्वीकृत नगरसेवक निवड देखील करण्यात आली.सायंकाळी कुडाळ नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष आफ्रिन करोल , उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेना ,काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ताधारी सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत विषय समित्यांच्या सभापती यांच्या निवड करण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने सौ.श्रेया शेखर गवंडे यांना बांधकाम आणि पर्यटन सभापती देण्यात आले.तर उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना पाणीपुरवठा सभापती ,अक्षता खटावकर यांना महिला बालकल्याण सभापती, आणि किरण शिंदे यांना आरोग्य व स्वच्छता सभापती निवड करण्यात आली आहे.आणि शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री संतोष शिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अभिप्राय द्या..