You are currently viewing साटेली भेडशी आरोग्य केंद्रात होणार सिंधू आरोग्य मेळावा लाभ घेण्याचे सभापती डॉ दळवी यांचे आवाहन

साटेली भेडशी आरोग्य केंद्रात होणार सिंधू आरोग्य मेळावा लाभ घेण्याचे सभापती डॉ दळवी यांचे आवाहन

दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे सिंधू आरोग्य मेळावा 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे या मेळाव्यात विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहे तरी दोडामार्ग तालुक्यातील जनेतेने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी केले आहे
या शिबिरात सर्व सर्वसाधारण आरोग्य तपासणी (ब्लडप्रेशर, ब्लडशुगर इ) रक्तचाचणी (होमोग्लोबिन, लिव्हर,किडनी,)अससर्गजन्यआजार (मधुमेह उच्च रक्तदाब मुख स्तन गर्भाशय मुख कर्करोग) आदी तपासण्या केल्या जाणार आहे यामध्ये सिंधु आरोग्य मेळाव्यात जिल्ह्यातील विविध विभागाकडून तज्ज्ञांच्या उपस्थितीत तपासणी होणार आहे
यामध्ये स्त्री रोगतज्ञ,अस्थिरोग तज्ञ,नेत्ररोगतज्ञ,जनरल फिजिशियन, कान ,नाक ,घसा तज्ञ,आदी उपस्थित राहणार आहे याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही डॉ अनिषा दळवी यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा