You are currently viewing सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करा.;खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची ना.अमित देशमुख यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करा.;खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची ना.अमित देशमुख यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग /-

मेडिकल कॉलेजच्या पुढील कार्यवाहीबाबत झाली चर्चा सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची बदली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज यावर्षी पासून सुरु होत असल्याने डॉ. एस. एस. मोरे यांची बदली रद्द करून त्यांची पूर्ववत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन केली. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. याची दखल घेत ना.अमित देशमुख यांनी डॉ. एस. एस. मोरे यांची बदली रद्द करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल ना. अमित देशमुख यांचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी आभार मानले. तसेच मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करणे,पुढील कार्यवाही तसेच आवश्यक सोयी सुविधा व इतर विषयांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेजला भेट देण्यासाठी ना. देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर कोणतीही मदत कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ना. देशमुख यांनी यावेळी दिली.

अभिप्राय द्या..