कणकवली /-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ गोसावी वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गरजू कुटुंबीयांना मास्क, गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या तसेच चॉकलेट वाटप सुद्धा करण्यात आला यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, युवक जिल्हा कार्यकारणी सदस्य सागर वारग, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, निखिल गोवेकर, सतीश जाधव, कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर, अक्षय शिर्के आदी उपस्थित होते.