You are currently viewing संजय राऊतांची कालची मुलाखत शिवसेनेसाठी नव्हती तर ती, स्वतःला “ईडी” पासून वाचविण्यासाठी होती.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल..

संजय राऊतांची कालची मुलाखत शिवसेनेसाठी नव्हती तर ती, स्वतःला “ईडी” पासून वाचविण्यासाठी होती.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल..

मुंबई/-

मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून शिवसेना संपविण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केला. दरम्यान राऊत यांची कालची मुलाखत ही शिवसेना वाढविण्यासाठी नव्हती, तर स्वतःचे “ईडी” पासून संरक्षण करण्यासाठी त्यांची ती केविलवाणी धडपड होती. त्यामुळेच त्यांना घाम फुटला, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. मुंबई येथे राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.

ते पुढे म्हणाले, श्री. राऊत यांचा आता मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. असा आरोप करत मर्द माणसाला आपली मर्दानगी सांगायची गरज नसते, ती त्याच्या स्वभावातूनच दिसते. ईडीला घाबरून पत्रकार परिषद घेतल्यामुळेच त्यांना घाम फुटला, असा आरोप त्यांनी केला. तर मी कट्टर शिवसैनिक आहे, असा गाजावाजा करणाऱ्या राऊतांनी शिवसेना स्थापनेनंतर त्यांचा जन्म कधी झाला आणि ते पक्षात कधी आले, हे त्यांनी सांगावे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, राऊत सामानात संपादक म्हणून आले आणि नंतर ते शिवसैनिक बनले. त्याआधी त्यांनी लोकप्रभात काम केले आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी लिखाण केले. त्यामुळे आता ठाकरे घराण्याचे गोडवे गाणे त्यांना शोभत नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. तर प्रवीण राऊत ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत यांच्या पायाखालची जमीन सटकली आहे. त्यामुळेच ते भाजपाच्या नेत्यावर बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांनी नुसते आरोप करू नयेत, हिम्मत असेल तर त्यांनी पुरावे द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. तर राऊतांचे अपहार आम्ही बाहेर काढू असे सांगत अलिबागला राऊतांनी घेतलेल्या जमिनीत त्यांनी खासदार निधीतून रस्ता केला, असा आरोप त्यांनी केला.

अभिप्राय द्या..