You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील आंबा – काजू बागायतदारांची बैठक संपन्न.

वेंगुर्ले तालुक्यातील आंबा – काजू बागायतदारांची बैठक संपन्न.

वेंगुर्ला /-     

वेंगुर्ले तालुक्यातील आंबा – काजू बागायतदारांची बैठक येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले च्या सभागृहात आंबा – काजू बागायतदार विचार मंच चे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.मागील वर्षी आलेले वादळ, बेमोसमी पाऊस व दीर्घकाळ असलेली थंडी या एकुणच वातावरणातील बदलामुळे आंबा – काजू पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर्षी फळबागावर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यासंदर्भात  विचारविनिमय करण्यासाठी येथील आंबा काजू बागायतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी आंबा – काजू बागायतदार विचार मंच चे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर,वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, बायोएरा ओर्गेनिक्स एलएलपी नाशिक चे डॉ. संदिप पवार, प्रताप गावस्कर, गजानन वेर्णेकर, स्वप्निल शिरोडकर, विरेंद्र कामत आडारकर, रत्नदिप धुरी, दिव्या वायंगणकर, सानवी नेमण, चंद्रकांत तिरोडकर, प्रकाश डिचोलकर आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. संदिप पवार यांनी फळमाशी उपद्रवाबद्दल सविस्तर माहिती दिली. जयप्रकाश चमणकर यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मोहोर येवूनही बदलत्या प्रतिकुल हवामानामुळे १० ते १५ टक्केच आंबा फलधारणा होत असल्याची भिती व्यक्त करुन ७ ते ८ वेळा कीटकनाशके  फवारणी करावी लागल्याचे सांगितले.यावेळी तौक्ते अत्यल्प नुकसान भरपाई, विमा पॉलिसी, कॅनिंगची दुरावस्था, महामॅंगो आदी विषयी चर्चा करण्यात आली .यावेळी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज यांनीही मार्गदर्शन केले.या बैठकीत आंबा काजू बागायतदार संघाची स्थापना करण्यासाटी दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग येथील आंबा, काजू बागायतदारांची बैठक घेण्याचे ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा