You are currently viewing राणेंच्या बंगल्याजवळ जाण्यापूर्वीच काँगेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला.;काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक.

राणेंच्या बंगल्याजवळ जाण्यापूर्वीच काँगेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला.;काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक.

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येथील काँग्रेस कार्यालयात पासून दुपारी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मात्र प्रांत कार्यालय येथे मोर्चा आला असता पोलिसांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी कणकवली पोलीस ठाण्यात केली. दरम्यान राणे यांच्या बंगल्यावर मोर्चा येणार असल्याने भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते.

अभिप्राय द्या..