सावंतवाडी /-

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत त्या नवीन नियमावलीनुसार येथील शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान देखील बंद करण्यात आले आहे त्यामुळे बच्चे कंपनी मध्ये नीर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत तर व्यापाऱ्यांच्या दिवसगणिकाची होणाऱ्या आर्थिक उलढालिवरही गार्डन बंद चा मोठा परिणाम होणार आहे यामुळे पुन्हा एकदा व्यापारीवर्ग मेटाकुटीस येण्याची शक्यता आहे.

शहरातील असलेले जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान कोरोना महामारीच्या लाटेत गेली दीड वर्ष बंदच होते यामुळे गार्डन वर आधारित काही छोटे व्यापारी यांना याचा मोठा फटका बसला होता यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जसजशी रुग्ण संख्या कमी होत गेली त्यानुसार हळू हळू निर्बंधांममध्ये शिथिलता देण्यात आली शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर येथील उद्यान देखील सुरू करण्यात आले होते लहान बच्चे कंपनी, महाविद्यालयिन मुले, वृद्ध आदींनी हे उद्यान फुलून निघाले होते तर त्यातच डिसेंबर महिन्यात लहान मोठ्या मुलांच्या मनोरंजनाचे अनेक साहित्य देखील दाखल झाले होते यामुळे तब्बल 2 वर्षांनंतर हे उद्यान पुन्हा एकदा त्या गर्दीने फुलून निघाले होते या गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांवर आधारित व्यवसाय | देखील हळू हळू पूर्व पदावर येत होते मात्र काल सायंकाळी राज्य शासनाने राज्यातील कोरूना संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू केले यात जिम, स्पा, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार येथील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान पालिकेकडून बंद करण्यात आले आहे यामुळे शहरातील नागरिकांचा हिरमोड झाला आहे तर अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक नागरिक गार्डन पाशी येऊन परतून जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page