You are currently viewing बाबा मला वाचवा आम.नितेश राणेंच्या “म्याव म्याव” चा शिवसैनिकांनी घेतला बदला..

बाबा मला वाचवा आम.नितेश राणेंच्या “म्याव म्याव” चा शिवसैनिकांनी घेतला बदला..

कणकवली /-

विधानभवनात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दाखल होत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी नितेश राणेंकडे दुर्लक्ष केले होते. आ. नितेश राणेंच्या या कृतीचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. आज शिवसेनेचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब वरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणेंना अटक करा या मागणीसाठी शिवसेनेने कणकवली पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस ठाण्यात जात असताना आणि पोलिसांना निवेदन देण्यापूर्वी शिवसैनिकांनी ‘बाबा मला वाचवा… कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत नितेश राणेंनी केलेल्या ‘म्याव म्याव’चा बदला घेतला. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत संतोष परब हल्ल्यात पोलीस बळाचा गैरवापर करून राज्य सरकार नितेश राणेंना अटक करण्याचा संभव असल्याचे म्हणत तसे झाल्यास आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता. तर आ. नितेश राणे यांनीही ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत या हल्ल्यात मला गोवून अटक करण्याचा डाव असल्याचे सांगितले होते. संतोष परब हल्ल्यात दिल्ली येथे पकडलेला सहावा आरोपी सचिन सातपुते हा नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता असून नितेश राणेंचा निकटवर्ती समजला जातो. त्यातच हल्ल्यानंतर जखमी संतोष परब याने हल्लेखोरांनी नितेश राणे आणि गोट्या सावंतला कळवायला पाहिजे, असे स्टेटमेंट दिल्याने आ. नितेश राणे व गोट्या सावंत यांची पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासकामी चौकशी केली आहे. संतोष परब हल्ल्यात पोलिसांचे पुढील टार्गेट नितेश राणे, गोट्या सावंत असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी नितेश राणेंच्या संभाव्य अटकेबद्दल केलेले वक्तव्य हे नितेश राणेंना प्रोटेक्ट करणारे आहे. त्यामुळेच ‘बाबा मला वाचवा… कॉक कॉक कॉक कॉक’ ही घोषणा देत शिवसैनिकांनी विधानभवनात नितेश राणेंनी काढलेल्या ‘म्याव म्याव’ आवाजाचा बदला घेतल्याचे आज दिसून आले.

अभिप्राय द्या..