You are currently viewing आम.नितेश राणे आणि राणे कुटुंबाच्या पाठीशी भाजपा ठाम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,नितेश राणेंना अटक झाल्यास कोर्टात न्याय मागू..

आम.नितेश राणे आणि राणे कुटुंबाच्या पाठीशी भाजपा ठाम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,नितेश राणेंना अटक झाल्यास कोर्टात न्याय मागू..

सिंधुदुर्ग /-

खोटेनाटे पुरावे गोळा करून जरी भाजपा आमदार नितेश राणेंना अटक केली तरी नितेश राणे आणि राणे फॅमिलीच्या पाठीशी भाजपा असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना नेते सतीश सावंत यांचा प्रचारप्रमुख संतोष परबवरील खुनी हल्ल्यात आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. याबाबत माध्यमांनी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की सत्ता जरी त्यांची असली तरी लोकशाही आणि कोर्ट अजून संपलेले नाही. केंद्रीयमंत्री नारायण राणेंना अटक केली. पुढे काय झालं ? दुसऱ्या सेकंदाला जामीन द्यावा लागला. त्यामुळे याही प्रकरणात जरी खोटेनाटे पुरावे गोळा करून नितेश राणेंना अटक केली तरी आम्ही कोर्टात न्याय मागू. राणे फॅमिलीच्या मागे भाजपा समर्थपणे उभी आहे.

अभिप्राय द्या..