You are currently viewing वेंगुर्लेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना “सुशासन अटल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार.

वेंगुर्लेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना “सुशासन अटल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार.

वेंगुर्ला /-


संपूर्ण देशात २५ डिसेंबर या दिवशी भाजपा च्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरी केली जाणार आहे.यावर्षीही सुशासन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन प्रदेश भाजपाने केले आहे.त्यामध्ये निमंत्रितांचे संमेलन व व्याख्यान, अटलजींच्या प्रतिमेचे पुजन, ग्रंथालयास अटलजींच्या पुस्तकाचे संच भेट देणे, स्वच्छता अभियानाचे आयोजन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात घेतलेले निर्णय तसेच योजनांची माहिती सर्वसामान्यांना देणे,ई श्रम कार्ड वितरीत करणे, त्याचप्रमाणे मनपा, नपा, जि.प., पंचायत समिती मधील सुशासनातील यशासाठी उत्तम कामगिरी केलेल्या भाजपा लोकप्रतिनिधी ची निवड करुन त्यांना ‘सुशासन अटल पुरस्कार’ देऊन सत्कार करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे.त्याच अनुषंगाने वेंगुर्ले शहरातुन आम जनतेतून निवडून आलेले भाजपा चे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी गेल्या पाच वर्षांत वेंगुर्ले शहराचा कायापालट केला .तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी विकास कामे करून, वेंगुर्ले पर्यटन शहर बनविले .त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा दर्जा टिकवून ठेवत स्वच्छतेचे देशपातळीवरील पुरस्कार मिळविले. त्याचप्रमाणे कला – क्रीडा – सांस्कृतिक – सामाजिक उपक्रम राबवुन जनमानसात वेंगुर्ले नगरपरिषदेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला .या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार’ दिलीप गिरप यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.याच कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर रोजी सकाळी १० .३० वाजता तालुका कार्यालयात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ” सुशासन अटल पुरस्कार ” देवुन सन्मानित करण्यात येणार आहे,अशी माहिती अभियान संयोजक तथा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.

अभिप्राय द्या..