You are currently viewing कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा शिवसेनेच्या बाजूने कौल.;शिवसेना तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांचा दावा..

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा शिवसेनेच्या बाजूने कौल.;शिवसेना तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांचा दावा..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील जनता ही कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने कौल देणार असल्याचे कुडाळ तालुका प्रवक्ते श्री संजय भोगटे यांनी शिवसेनेच्या आयोजित पत्रकार परिषदेत दावा केला आहे.शिवसेने कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत विकास आघाडीचे सरकार कुडाळ नगरपंचायत ला आणणार आहे.मागच्या वेळेस सत्ता आमच्या जवळ नव्हती पण आता ती सहज येईल असा दावा संजय भोगटे यांनी केला आहे.आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून असंख्य कामे केली.रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी आपण दिलाय.शहराचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील होतो. कुडाळसाठी गार्डनची आवश्यकता होती.मात्र, याला सत्ताधारी गटाकडून विरोध केला गेला तसेच जनतेच्या पैशातून डम्पिंग ग्राउंडची जमीन मोठ्या रक्कमेने खरेदी करून नगरपंचायत जमीन खरेदीत भाजप सत्ताधाऱ्यानी घोटाळा केला आहे.कुडाळ नगरपंचायतवर शिवसेना विकास आघाडी सत्ता आल्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून कुडाळ शहरातील विकास कामे ही प्राधान्याने मार्गी लागतील कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत.तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री हे शिवसेनेचे आहेत त्यामुळे विकास कामे मार्गी लागतील.आणि कुडाळ शहरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही असे शिवसेना कुडाळ तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

अभिप्राय द्या..