सिंधुदुर्ग /-

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरोस यांच्यामार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्यातील एन.सी.सी सिनियर डिव्हिजन व सिनियर विंग कॅडेट्ससाठी Combined annual Training- ३१७ कॅम्पचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प १३ डिसेम्बर २०२१ ते १९ डिसेम्बर २०२१ या दरम्यान क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पसाठी सिंधुदुर्ग जिल्यातील बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व कणकवली महाविद्यालयामधील एन.सी.सी. २११ मुले व मुलींनी (कॅडेटसनी) दि. १३ डिसेंबर रोजी सहभाग नोंदविला आहे. सदर कॅम्पचे उदघाट्न ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज यांनी केले व सहभागी कॅडेटसना मार्गदर्शन करून कॅम्पसाठी शुभेच्छा दिल्या. या कॅम्प मधून कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी ड्रिल, नेतृत्वगुण कौशल्य, शारीरिक तंदरुस्ती, सामाजिक एकता, देशभक्ती, बंदूक चालवणे, प्रथमोपचार पद्धती, आपत्कालीन व्यवस्थापन इ. कला गुणांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. सदरचा कॅम्प यशस्वी करण्यासाठी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार पांडा, ट्रेनींग जे.सी.ओ इंद्रकेश, बी.एच.एम.सुरजित सिंग सहित ५ जे.सी.ओ, १० एन.सी.ओ आणि इतर ऑफिस स्टाफ गेले दोन महिने अविरतपणे कार्यरत आहेत. या कॅम्प साठी कणकवली व वेंगुर्ला कॉलेजचे एन्.सी.सी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ. बी.एल. राठोड, लेफ्टनंट डॉ. बी.जी गायकवाड यांची कॅम्प ऑफिसर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page