You are currently viewing युवा फोरमची मालवण दांडी येथे बैठक संपन्न..

युवा फोरमची मालवण दांडी येथे बैठक संपन्न..

मालवण /-

आज दिनांक १४ डिसेंबर रोजी मालवण जेट्टी येथील दुकानदार व व्यावसायिकांसोबत दांडी समुद्र किनारा व जेट्टी येथील स्वच्छता राखण्याबाबत बैठक संपन्न झाली. दुकानदारांनी त्यांच्या समस्या व त्यांच्या मागण्या मांडल्या व युवा फोरमच्या माध्यमातून उपाय मिळतील अशी आशा व्यक्त केली. बैठक संपन्न झाल्यानंतर युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे यांच्यासह हर्षल देसाई, मेगल डिसोझा, केतन शिरोडकर, रोहन करमळकर, विनोद निकम, एलविरा गिरकर, सेलविरा लुडबे यांनी नगरपालिकेत माननीय मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या समोर सर्व परिस्थिती मांडून त्यावरचा Action Plan सादर केला. नगरपालिकेकडून सर्व सहकार्य मिळण्याचे आश्वासन मा. मुख्याधिकारी यांनी दिले आणि लवकरच समस्यांचे निवारण होईल अशी खात्री व्यक्त केली.

अभिप्राय द्या..