You are currently viewing मंगेश लोके मित्रमंडळ, ग्रामपंचायत खांबाळे व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

मंगेश लोके मित्रमंडळ, ग्रामपंचायत खांबाळे व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

वैभववाडी /-

खांबाळे गावात मंगेश लोके मित्रमंडळाने आयोजित केलेलं आरोग्य शिबीर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून अशा प्रकारची शिबिरे गावा गावातून झाली पाहिजे जेणे करून प्रत्येक नागरिकाला आणि गोरगरीब जनतेला गावातच सर्व आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होऊन आजाराचे योग्य प्रकारे निदान होईल असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.

या शिबिरात नेत्र तपासणी- १०५, सांधेदुखी- ८०, मूत्रविकार- २०, हृदयविकार- १५ असे एकूण २२० शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला.

यावेळी व्यासपीठावर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, खांबाळे सरपंच गौरी पवार, मुंबई गुन्हेअन्वेषण विभागाचे निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाक लोके, शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, पोलीस उपनिरीक्षक पाटील, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, अथायु हॉस्पिटलचे डॉ. राहुल चौगुले, सुनिल पाटील, सोरभ नुले, मदन गोरे, उपसरपंच गणेश पवार, ग्रामसेवक उमेश राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, माजी सरपंच विठोबा सुतार, सारिका सुतार, माजी चेअरमन दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, बंडू गुरव, अमोल चव्हाण, प्राजक्ता कदम, रसिका पवार, भारती बोडेकर, दर्शना मोरे , विरार शाखाप्रमुख महेश लांजवळ, मुख्याध्यापक उत्तम पाटील आदी उपस्थित हॊते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अंबाजी पवार, जयेश पवार, तेजस पवार, अभिषेक माळकर, पंकज चव्हाण, मुकेश पवार,संकेश पवार, विलास मोहिते, दिनेश पालकर,दीपक मोहिते, अक्षय पवार, समीर पवार, नरेश पालकर, विक्रांत पवार, दीप मोरे, राज पवार आदींनी विशेष मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रुपेश कांबळे यांनी मानले.

अभिप्राय द्या..