You are currently viewing खारेपाटण सोसायटीच्या कार्यालयाबाहेर रेशनकार्ड धारक नागरिकांची ऑनलाइन थम्स चेकिंगसाठी गर्दी..

खारेपाटण सोसायटीच्या कार्यालयाबाहेर रेशनकार्ड धारक नागरिकांची ऑनलाइन थम्स चेकिंगसाठी गर्दी..

कणकवली /-

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या सोसायटीच्या कार्यालयाबाहेर व रेशनधान्य पुरवठा दुकानांच्या बाहेर आज रविवारी सकाळी ७.०० वाजल्या पासूनच दशक्रोशीतील रेशनकार्ड धरकांनी ऑनलाइन बायोमेट्रिक थम्स व्हेरीफिकेशनसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे वाढलेली गर्दी आवरताना सोसायटी प्रशासनाची दमछाक झाली.

याबाबत अधिक वृत्त असे की, नुकतेच महाराष्ट्र्र राज्याचे पुरव विभागाचे उपआयुक्त विवेक गायकवाड हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सोसायटीच्या माध्यमातून रेशनधान्य दुकानांवर वितरण करण्यात येणाऱ्या ऑनलाइन बायोमेट्रिक मशीनवर कार् धारकांची अजूनही नोंद समाधानकारक झाली नसल्याची बाब त्यांनी जिल्ह्यातील पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती व कार्डधारकांच्या ऑनलाइन नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी जिल्ह्यातील पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर खारेपाटण दशक्रोशीतील कार्डधारक नागरीकांनी खारेपाटण सोसायटीच्या रेशन धान्य दुकानांवर गर्दी केली होती.

यावेळी कणकवली तालुका महसूल कार्यालयातील पुरवठा शाखेचे अधिकारी आर. एम. कांबळे, नितीन डाके, श्री. लोकरे, विलास तळेकर, श्री. पेडणेकर, श्री. नारकर आदी अधिकारी, धान्य दुकानदार व कर्मचारी वर्ग उपस्थित राहून त्यांनी एकावेळी एकूण १० बायोमेट्रिक मशीन सुरु करून खारेपाटण सोसायटी अंतर्गत येणाऱ्या रेशनधान्य कार्ड धारकांची जास्तीत जास्त ऑनलाइन आधारकार्डसह थम्स चेक करून नोंदी पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. सकाळी ७.०० वाजल्यापासून रेशकार्ड धारक नागरिक या प्रक्रियेसाठी उपस्थित होते. तर अधिकारी वर्ग थोड्या उशिराने आल्याने नागरिकांनी तथा रेशन कार्ड धारकांनी नाराजी व्यक्त केली. तर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी १.०० नंतर गर्दी हळू हळू कमी झाली. यावेळी खारेपाट सरपंच रमाकांत राऊत, सोसायटीचे चेअरमन विजय देसाई, संचालक एकनाथ कोकाटे, इस्माईल मुकादम, सुरेंद्र कोरगावकर उपस्थित होते. ऑनलाइन बायोमेट्रिक मशीनचे काम १ डिसेंम्बर ते १४ डिसेंम्बर पर्यंत चालू असून खारेपाटण सोसायटीला याबाबत पत्रव्यवहाराने कळविण्य आले होते. मात्र खारेपाटण रास्त धान्य दुकानांवरील बरीच रेशन कार्ड धारकांची बायोमेट्रिक मशीनवर तपासणी झालेली दिसत नव्हती. त्यामुळे हे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने व ग्राहकांना देण्यात येणारी धान्य पुरवठावितरण सेवा व ऑनलाईन काम सुरळीत पार पडण्याच्या उद्देशाने रेशन कार्ड तपासणी कॅम्प लावण्यात आला असल्याचे कणकवली पुरवठा शाखेचे अधिकारी आर. एम. कांबळे यांनी यावेळी सांगितले.

अभिप्राय द्या..