You are currently viewing तळेरे ग्रामपंचायतिच्या माध्यमातून राबवली स्वच्छता मोहीम ग्रा.पं. मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार..

तळेरे ग्रामपंचायतिच्या माध्यमातून राबवली स्वच्छता मोहीम ग्रा.पं. मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार..

कणकवली /-

तळेरे ग्रा.पं. च्या वतीने तळेरे मच्छीमार्केट परिसरातील तसेच गणेश विसर्जन घाट रस्त्यावरील कचऱ्याची कचरा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. तसेच तळेरे बाजारपेठेत ग्रा.पं. मालकीच्या रस्त्यावर ज्या दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत ती सर्व अतिक्रमण ग्रा.पं. कडून हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच राबविण्यात येणार असून तशी जाहीर नोटीस तळेरे ग्रा.पं. च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तळेरे वासीयांनी कचरा निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापनबाबत ग्रा.पं. सहकार्य करावे, असे आवाहन तळेरे ग्रा.पं. च्या वतीने सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, ग्रामसेवक युवराज बोराडे व सर्व ग्रा.पं. सदस्यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..