सावंतवाडी /-

माजगाव येथून बेपत्ता असलेले भाई उर्फ लक्ष्मण गंगाराम निब्रे (५८), रा. ख्रिश्चनवाडी, यांचा मृतदेह घरा नजीकच्या शेत विहिरी आढळून आला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे भाऊ राजन गंगाराम निब्रे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार बाबू तेली यांनी दिली.

मृत निब्रे हे काल दुपारपासून बेपत्ता झाले होते. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार शोधाशोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह घरानजीक शेतविहिरीत आदळून आला. दरम्यान याबाबतची खबर त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page