You are currently viewing मालवण दत्त मंदिरातील कार्तिकोत्सवाची आज झाली सांगता.;भरड येथे शेकडो भाविकांची होती उपस्थिती.

मालवण दत्त मंदिरातील कार्तिकोत्सवाची आज झाली सांगता.;भरड येथे शेकडो भाविकांची होती उपस्थिती.
मालवण /-


एकमुखी दत्त मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून गेले महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीतही शेकडो आबाल वृद्ध सहभागी झाले होते. मालवण भरड येथील श्री एकमुखी दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या कार्तिकोत्सवाची आज त्रिपुरा पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सांगता झाली. गेले महिनाभर या मंदिरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काकड आरतीला प्रारंभ होत होता. प्रथापरंपरेची जपणूक करीत शेकडो भाविक या काकड आरतीला हजेरी लावत होते. टाळ मुदंगाच्या साथीने सुमधुर आवाजात पहाटेच्या मंगल समयी मंदिरात सुरू असणाऱ्या अभंग आर्त्यांमुळे सारा परिसर भक्तिमय झाला होता. दरदिवशी विविध फुलांची गुंफण करीत बनविण्यात आलेल्या हारांनी श्री एकमुखी दत्ताची मूर्ती सजविण्यात येते. आज या कार्तिकोत्सवाची सांगता असल्याने शहरातील भाविकांनी भल्यापहाटे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूपाळी, अभंग, काकड आरती झाल्यानंतर मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्ताची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. दत्त मंदिर ते भरड मार्गे तिरोडकर यांच्या महापुरुष ते पुन्हा भरड मार्गे दत्त मंदिर दिमाखात पार पडला. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर या कार्तिकोत्सवाची सांगता झाली. या वर्षी भाविकांसाठी खास या सोहळ्याचे यूट्यूब थेट प्रक्षेपण ही करण्यात आले होते. कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव पार पाडन्यायत आला.

अभिप्राय द्या..