You are currently viewing मध्यधुंदीत चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पिंगुळी येथे कंटेनरला अपघात.;गाडीचे मोठे नुकसान..

मध्यधुंदीत चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पिंगुळी येथे कंटेनरला अपघात.;गाडीचे मोठे नुकसान..

कुडाळ/-

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे थेट डीवाईडरच्या पलीकडे गेल्याने कंटेनरला अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी वड-गणेश परिसरात घडला. हा कंटेनर कुडाळवरून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. अपघात झाल्याचे लक्षात येताच वाहनधारकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती.

अभिप्राय द्या..