You are currently viewing महिला शहराध्य सौ.ममता धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

महिला शहराध्य सौ.ममता धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

कुडाळ /-

वीरता, जिद्द आणि असीम धैर्याचे प्रतिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीची राणी यांची जयंती कुडाळ शहर भाजपाने अतिशय कौतुकास्पद उपक्रमासह साजरी केली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयात आज शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा महिला शहराध्यक्षा सौ मृण्मयी चेतन उर्फ ममता धुरी यांनी आयोजित केला.असीम शौर्याने ब्रिटिशांचे जोखड झुगारून देत स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र सर्वांनाच प्रेरणादायक आहे. परंतु आज विकासाच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी महिलांना ते सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे.असे सौ ममता धुरी म्हणाल्या. त्यांच्या जयंतीचे निमित्त साधत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार भाजपा कुडाळ शहर महिला आघाडीने आयोजित केला होता.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा कुडाळ शहराच्या वतीने येथील भाजप कार्यालयात साजरी करण्यात आला यावेळी हा कार्यक्रम महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे ,कुडाळ भाजप तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी, भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी माजी नगरसेविका साक्षी सावंत महिला जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर मुक्ती परब तेजस्वीनी वैद्य अदिती सावंत अक्षता कुडाळकर प्राची आठल्ये ग्रीष्मा कुंभार जयश्री कुंभार मोहिनी राणे लक्ष्मी पाटील स्मिता शिरसाट प्रतिभा रेवडेकर विशाखा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..