You are currently viewing भाजपकडून वेंगुर्ले – मठ भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना ताडपत्री वाटप..

भाजपकडून वेंगुर्ले – मठ भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना ताडपत्री वाटप..

वेंगुर्ला /-

मंगळवारी झालेल्या चक्रीवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील सतयेवाडी, मठकर वाडी, बोवलेकर वाडी व गावठणवाडी येथे घरावर झाडे व माड पडुन भरपूर नुकसान झाले. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामस्थांची अपरिमीत हानी झाली.आंब्याची झाडे पडुन नुकसान झाले. तसेच घरे व गुरांचे गोठे यांच्यावर झाडे कोसळून गोरगरीब लोकांचे बरेच नुकसान झाले.

नुकसानीची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तातडीने भेट दिली.तसेच नुकसान झालेल्या प्रत्येक वाडीत जाऊन नुकसानग्रस्तांना ताडपत्री दिली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मठ सरपंच तुळशीदास ठाकुर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, युवा नेते अजित नाईक, शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर, बुथप्रमुख अनिल तेंडोलकर, रा.स्व.संघाचे ओंकार मराठे, सुनील तेंडोलकर, संतोष परब, महेश धुरी, रविंद्र खानोलकर, अमोल ठाकुर, शेखर गावडे, नितीश कांबळी, किशोर पोतदार, केशव ठाकुर, गजा मांजरेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी,सतयेवाडी,मठकरवाडी,बोवलेकरवाडी,गावठणवाडी आदी भागातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले.याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

अभिप्राय द्या..