You are currently viewing नांदरुखच्या श्री.देव गिरोबाचा वार्षिक जत्रौत्सव २१ नोव्हेंबरला.

नांदरुखच्या श्री.देव गिरोबाचा वार्षिक जत्रौत्सव २१ नोव्हेंबरला.

मालवण /-

मालवणसह एकूण सात गावांची मुळ ग्रामदैवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवार दि. २१ नोव्हेंबरला होणार आहे. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना नांदरुख गावात मुख्य बाजारपेठ वसविली होती. या गावातून घोडेस्वारी करीत त्यांनी मालवण गाठले होते. त्यावेळी मालवण शहर नगरपालिकेसह कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवड या विद्यमान पाच ग्रामपंचायती या नांदरुख गावच्या मुळ वाड्या होत्या. त्यामुळेच गिरोबा ही ग्रामदेवता पुर्वीच्या याही सात वाड्यांची मुळ ग्रामदेवता आहे. हा इतिहास समजल्याने या सर्वंच भागातील भाविक गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने जत्रोत्सवाला अलोट गर्दी करतात.

अभिप्राय द्या..