You are currently viewing माऊली देवीने मला शक्ती दीली,! आशिर्वाद मिळाला म्हणुनच चेंदवण गावचा विकास माझ्या हातुन होत आहे.;आ.वैभव नाईक

माऊली देवीने मला शक्ती दीली,! आशिर्वाद मिळाला म्हणुनच चेंदवण गावचा विकास माझ्या हातुन होत आहे.;आ.वैभव नाईक

कुडाळ /-

चेंदवण गावाच्या विकासासाठी मला माऊली देवीने शक्ती देत माऊलीचे आशिर्वाद मिळाले म्हणून मी चेंदवण गावचा विकास करु शकलो असे भावनिक गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण पडोसवाडी येथे काढले चेंदवण पडोसवाडी येथील समीर शृंगारे यांनी आयोजित केलेल्या भजन डबलबारी कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन आम नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी आम नाईक बोलत होते, आम नाईक म्हणाले समिर शृंगारे यांच्या सारखे एक हुरनरी व्यक्ती यशस्वी उद्योजक बनतात हा आदर्श परीसरातील तरुणांनी घ्यावा असे सांगुन श्री नाईक म्हणाले कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेने मला दोन वेळा आमदार केले याचे भान ठेवून मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा आणि विकासाचा गाढा हाकत आहे तसेच टीका टिपणी होते परंतु याकडे फारसा लक्ष देत नसुन माऊली देवीच्या आशिर्वादाने मतदार संघाबरोबर चेंदवण गावचा विकास करत असताना या पंचक्रोशीतुन जनतेने मला भरभरुन प्रेम दीले आहे असे सांगून आम नाईक म्हणाले ज्या ज्या मला हाक द्याल त्या त्या वेळी मी तुमचा सेवक म्हणून सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही आम नाईक यांनी दीली यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कलाकार मानधन समिती अध्यक्ष राजा सामंत, समिर शृंगारे, शैलेश शृंगारे, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शिवसेना ओबीसी शहर प्रमुख राजु गवंडे, अमित राणे, उपस्थितीत होते यावेळी आम नाईक यांनी हुमरमळा वालावल माऊली मंदिर रस्ता अडीच कोटी रुपये मंजूर करुन पुर्ण केला म्हणून पडोसवाडी ग्रामस्थांनी आम नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

अभिप्राय द्या..