You are currently viewing कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त..

कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील दारुम ओझरम माळवाडी येथील मांगराच्या पडवीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली. यात रोख रक्कमेसह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारुम ओझरम माळवाडी येथे जुगार सुरू असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएससाय बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.त्यावेळी शहाजी गंगाधर पनिकर, रा. ओझरम, माळवाडी, स्मितेश अनिरुद्ध पनिकर, रा. कासार्डे पेट्रोलपंपाजवळ, मंगेश बाळकृष्ण भांबुरे, रा. बाजारपेठ तळेरे, संतोष अनंत महाडिक, रा.बाजारपेठ तळेरे, संजय गणपत चव्हाण, रा.गावठणवाडी, तळेरे हे तीन पत्ती जुगार खेळताना सापडले. या पाचही जणांकडून एकूण रोख रक्कम 22 हजार 700 , 5 मोबाईल, 2 मोटरसायकल असा एकूण 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस नाईक पांडुरंग पांढरे, कॉन्स्टेबल किरण माने, कॉन्स्टेबल माने, कॉन्स्टेबल जांभळे, चालक कॉन्स्टेबल मकरंद माने सहभागी झाले होते. फिर्याद पोलीस नाईक पांढरे यांनी दिली असून अधिक तपास एएसआय बापू खरात करत आहेत.

अभिप्राय द्या..