You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार.;आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार.;आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी सरकार म्हणूनच लढवली जाणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला सोबत घेऊनच लढणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत शहरात सत्ता बदल झाल्यानंतर शहरात स्टॉल ची संख्या वाढली असून, हे कुठेतरी थांबवले पाहिजे. असे मत त्यानी व्यक्त केले आहे. सावंतवाडी शहर हे शांत व सुसंस्कृत शहर म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. त्यामुळे शहरात पर्यटन येण्यासाठी शहरात योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. जनतेनी आता विचार करून नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करावे. जनतेनी आता जागृत होणे गरजेचे असल्याचे मत आमदार केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अभिप्राय द्या..