You are currently viewing माझ्या मतदारसंघात येऊन क्रेडिट घेण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते खड्डे नितेश राणेंनी पहवे.;आम.दिपक केसरकर.

माझ्या मतदारसंघात येऊन क्रेडिट घेण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते खड्डे नितेश राणेंनी पहवे.;आम.दिपक केसरकर.

सावंतवाडी /-

तालुक्यातील रस्त्याची कामे पावसामुळे अडकली होती. परंतु, आता पाऊस गेल्याने अडकलेली रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांनी माझ्या मतदार संघात येऊन रस्ते पाहण्यापेक्षा स्वतःचा मतदार संघातील रस्ते पहावेत असा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी बांदा ते दोडामार्ग येथील रस्त्याची झालेल्या दुर्दशेमुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण तेथील जनतेची जाहीर माफी मागतो. असे सांगत माफी मागितली. कोणीही उपोषणाला बसल म्हणून ते काम लगेच होऊ शकत नाही. त्याला प्रोसेस आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या मतदार संघात येऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन क्रेडिट घेण्यापेक्षा स्वतःचा मतदार संघातील रस्ते पहावेत. अशी टीका आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
तालुक्यातील रस्त्याची कामे आता सुरू झाली असून, ती कामे योग्य प्रकारे चालली आहेत की नाही. याची आपण येत्या दोन दिवसात पाहणी करणार असून, त्या रस्त्याची कामे योग्य प्रकारे झाली नसल्यास सबंधित कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अभिप्राय द्या..