वेंगुर्ला –


आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ आल्यास शिवसेनेला  स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत.त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. तसेच संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथे झालेल्या वेंगुर्ला येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. 
वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा मंगळवारी येथील साई मंगल सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.अरुण दुधवडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दिपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, कुडाळ तालुका प्रमुख राजू शेट्ये, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनील डुबळे,सचिन देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहर संघटक मंजूषा आरोलकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, विवेकानंद आरोलकर, संजय गावडे, निलेश चमणकर आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांचे या जिल्ह्यासाठीचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी शेतकरी, मच्छिमार तसेच श्रमजीवी वर्गासाठी चांदा ते बांदा हि योजना आणली व त्याचा अनेकांनी लाभ घेतला. आज कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशातच केंद्र सरकारने पेट्रोल –  डिझेलच्या माध्यमातून जनतेची लूट चालवली आहे. टेम्पो, ट्रक व्यावसायिक मेटाकुटीस आला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यसाठी ६७ नवीन अम्ब्युलस प्राप्त झाल्या आहेत.येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होण्यासाठी शिवसेनेचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांनी केलेली विकास कामे तळागाळातील लोकांपर्यत पोहचवा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 
यावेळी बोलताना आमदार दिपक केसरकर म्हणाले की,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणावर विशेष लक्ष आहे.विविध ठिकाणची विकासकामे केली जातील.पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते होण्यासाठी प्रयत्नशील राहणार.आगामी येणारा कालावधी हा निवडणुकांचा आहे.त्यामुळे आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा.येत्या दोन तीन महिन्यात जिल्हयातील सर्व मुख्य रस्ते केले जातील. रस्ता कामांसाठी पैसे मंजूर आहेत, पण कामे झाली नाहीत अशा कामांची लिस्ट करा तसेच गावागावात आवशयक विकासकामांची यादी करुन कार्यकर्त्यांनी आपल्याकडे द्यावी असे आवाहन केसरकर यांनी केले. खासदारकीची निवडणुक झाली, आमदारकीची निवडणुक झाली आता होवू घातलेल्या निवडणुका या तूमच्या आहेत. त्यामुळे  निवडून येणारे उमेदवार निवडा. शिवसेने मार्फत झालेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन यावेळी केसरकर यांनी केले.येत्या सर्वच निवडणुका या आपल्याला पुर्ण ताकदीनिशी लढवायच्या आहेत. वेंगुर्ले तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.हा बालेकिल्ला अभेद्य राहाण्यासाठी न. प. च्या प्रत्येक प्रभागात तसेच जि. प. प्रभाग मध्ये शाखाप्रमुख, गटप्रमुख नियुक्त करा.आपापसातील मतभेद विसरुन कामास लागा असे आवाहन संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.आमदार दिपक केसरकर यांनीही आपल्या मतदार संघाकडे विशेष लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख संजय पडते बोलताना म्हणाले की,दिपक केसरकर पालकमंत्री असताना अनेक विकासकामे झाली आहेत.खासदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत.८० %समाजकारण व २० % राजकारण हे शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.वेंगुर्ले तालुका आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.त्यामुळे येथे आगामी निवडणुकीत भगवा फडकणार.यावेळी किल्ले बांधा स्पर्धेतील विजेते प्रथम बाल गणेश क्रीडा मंडळ भटवाडी, व्दितीय भटवाडी मंडळ, तृतिय सप्तरंग भटवाडी, उत्तेजनार्थ जय महाराष्ट्र ग्रूप गावडेवाडी यांनी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच उप जिल्हा प्रमुखपदी निलेश चमणकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी नितीन मांजरेकर, ओबीसी सेल उपतालुका प्रमुखपदी योगेश शेटये, आडेली ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता मुंडये यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला संघटक सुकन्या नरसुले, उप जिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनिल डुबळे, बाळा दळवी, कार्मिस आल्मेडा, संजय गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात पाहण्यांचे स्वागत, प्रास्ताविक तालुका प्रमुख यशवंत परब यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वालावलकर व आभार निलेश चमणकर यांनी मानले.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page