You are currently viewing कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात.;कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार.

कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात.;कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार.

दोडामार्ग /-

कोनाळ मेन कॉलनी येथे बी.एस.एन एल टॉवर उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. हा टॉवर व्हावा यासाठी कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी खुप वर्षापासुन याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार केलेत. तसेच तिलारीतील जुना मोबाईल टॉवर सुरु करण्या संदर्भात कींवा नवीन टॉवर सुरु करण्यासंदर्भात वारंवार पाठापुरावा ग्रामपंचायत कोनाळ कडुन करण्यात आला होता. आज कोनाळ सरपंच पराशर सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. पुढील महीन्यात लोकांना असलेली नेटवर्कची अडचण दुर होण्यास मदत होईल असे मत कोनाळ सरपंच पराशर सावंत यानी व्यक्त केले. यावेळी उपसरपंच प्रितम पोकळे ग्रामसेवक जे.बी.खानोलकर,माजी उपसरपंच पांडुरंग लोंढे,जलसंपदा विभागाचे अधिकारी संदेश तोडकर , बी. एस. एन. एल चे अधिकारी जयंन्त पंडीतराव ,अमृत जाधव, सॕलवीन डायस, पास्कु लोबो,विशाल सुतार आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..