देवगड /-

१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छता मोहीम ही प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करता प्लॅस्टिक मुक्ती होणे गरजेचे आहे. परंतु अस्तित्वात असलेला प्लॅस्टिक कचरा संकलन करणे हे या अभियानाचे लक्ष आहे. याच स्वच्छ भारत अभियानंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच प्लास्टिकला पर्यायी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर यावर नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत मार्गदर्शन केले जात आहे.

श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल येथे स्वच्छता मोहीम आणि प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन घेण्यात आले. इतस्ततः विखुरलेला जाणारा प्लॅस्टिक कचरा हे पूरपरिस्थिती कारणांपैकी एक आहे. प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत असल्याने कचऱ्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र तरीही हे सर्व प्लास्टिक एकत्र करून त्याचा पुनर्वापर करावा. यामुळे प्लास्टिकचा कचरा आपोआप मुख्य कचऱ्यातून वेगळा होईल आणि पर्यावरणाच्या हानीचा प्रश्न सुटेल. तसेच त्यासाठीचे तंत्रज्ञान अवगत केल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल. प्लॅस्टिक बाटल्या, बरण्या या कचऱ्यात टाकण्याऐवजी त्याचा शोभेच्या वस्तू बनवताना आपल्यातील कलेलादेखील वाव द्या असे नेहरू युवा केंद्र समन्वयक रीना दुदवडकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. पर्यावरणाच्या हिताच्या, संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणातील सर्व सजीव घटकांचा विचार करून त्यांच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये रुजविणे म्हणजे उद्याचा जबाबदार युवक घडविणे या नेहरू युवा केंद्रच्या कार्याबद्दल मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग चे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, सहाय्यक शिक्षिका शुभांगी बोडस, स्नेहा कोकरे आणि अजित तानवडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page