You are currently viewing कोळपे जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न.;खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

कोळपे जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न.;खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

वैभववाडी /-

राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज ची मान्यता रद्द करण्यासाठी केलेली धडपड सर्व जिल्हा वासीयांना माहीत आहे. केंद्रीयमंत्री झाल्यावर जनतेला वाटत होते काही तरी श्वास्वत विकास होईल परंतु यांनी फक्त केंद्रीय मंत्रिपदाचा वापर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी केला आहे. यामुळे भाजप पक्षात आपले वजन वाढून वरिष्ठांना खुश करण्यासाठी सध्या केविलवानी धपडपड चालू आहे. ती त्यांनी तशीच सुरू ठेवावी याचा फायदा महाविकास आघाडी सरकारला निश्चितच फायदा होईल.

त्याचप्रमाणे तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत गेल्या 7 वर्षात अनेक ग्रामीण भागातील रस्ते, मुख्यमंत्रीसडक योजमधून तसेच, जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा, डोंगरी विकास योजना, स्थानिक खासदार निधी या सर्व योजनेमधून झालेली व होत असलेली विकासकामे ही तत्कालीन पालकमंत्री दिपकभाई केसरकर, सध्याचे पालकमंत्री उदय सामंत व या भागाचा खासदार म्हणून आम्ही सातत्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावलेली आहेत. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मुस्लीम बांधव, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमच्या शिवसेना पक्षावर व आमच्यावर विश्वास ठेवुन जाहीर प्रवेश केलात त्याबद्दल मी शिवसेना सचिव आणि स्थानिक खासदार या नात्याने आपले शिवसेना पक्षात स्वागत करून आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद देतो. यापुढिल काळात या मतदारसंघातील जास्तीतजास्त विकास कामे मार्गी लावून आपले विविध प्रश्न लवकरात लवकर सोवडविण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीला कंटाळुन भाजप (राणे समर्थक) व इतर काही पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश करीत हाती शिवबंधन बांधले व हाती भगवा झेंडा घेतला. गेली अनेक वर्षे या मतदारसंघात जि प. च्या सत्ताधाऱ्यांनी नेतृत्व केले होते. परंतु या नेतृत्वाने या भागातील तसेच कोळपे गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविल्या नव्हत्या. फक्त निवडणूक आली की येथील भोळ्या भाबड्या जनतेला हाताशी धरून येथील स्थानिक पुढारी आपले वर्चस्व वरिष्ठांना दाखवून आपली स्वतःची कामे करून घेत होते. गेली अनेक वर्षे सत्ता असून देखील कुठल्याही प्रकारचे विकासकामे किंवा अन्य समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सध्याचे स्थानीक आमदार अपयशी ठरले होते. त्यामुळेच या भागातील सुमारे 300 ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर तसेच कोळपे गावचे भाजपचे कार्यकर्ते शबान उस्मान राऊत, अभिद महमद थोडगे, समीर हुसेन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील 300 कर्यकर्त्यानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचप्रमाणे मौंदे गावच्या सरपंच ज्योत्स्ना जगन्नाथ मोरे, वेंगरसर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काझी यांचे खंदे समर्थक विलास पावसकर, जांभवडे गुरववाडी येथील मधुकर विश्राम गुरव, नेर्ले गावचे माजी पोलीसपाटील विश्वास राजाराम पाटील, कोळपे ग्रामपंचायत सदस्य अनंत जाधव यांच्यासह या भागातील शेकडो राणे समर्थक यांचा प्रवेश झाला.

अभिप्राय द्या..