You are currently viewing आर्यनची आजची रात्र तुरुंगातच.;उद्या पार पडणार सुनावणी..

आर्यनची आजची रात्र तुरुंगातच.;उद्या पार पडणार सुनावणी..

मुंबई /-

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचं एनसीबीने यावेळी न्यायालयात सांगितलं.मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.

काय म्हणाले आर्यनचे वकील ?

माझ्या क्लायंटकडून(आर्यन खान) कोणतीही गोष्ट हस्तगत करण्यात आलेला नाही. आणि त्याने कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. 3 ऑक्टोबरला त्याचे स्टेटमेंटही नोंदवण्यात आले आहे. आम्ही अनेक याचिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की हे अधिकारी पोलीस अधिकारी नसले तरी ते पोलिसांचे अधिकार वापरतात. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा अधिकार असल्याचे ते सांगतात. मात्र, आर्यनकडून कोणताही अमली पदार्थ मिळालेला नाही. त्याने कशाचंही सेवन केलं नव्हतं. त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली नाही. रोहतगी यांनी पंचनामा वाचून दाखवताना आर्यनचा मोबाईल जप्त केल्याची कोणतीही माहिती पंचनाम्यात नसल्याचं सांगितलं.

अरबाजकडे ड्रग्ज मिळाले. मात्र, आर्यनच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते.सोबत असणाऱ्या अन्य व्यक्तीकडे ड्रग्ज होते. मात्र, याचा अर्थ त्याबद्दल मला माहिती आहे, किंवा मी ते सेवन करणार आहे, असं होत नाही. त्यामुळे अनधिकृतपणे ही अटक करण्यात आली आहे, असे अॅड. रोहतगी म्हणाले.त्यामुळे माझ्यावर 27A अंतर्गत आरोप नाही. पण एनसीबी माझ्यावर कट रचत आहे. अप्रत्यक्षपणे NDCP कायद्याचे 27A आणि नंतर NDPS च्या कलम 37 अंतर्गत गुन्हा दाखल करणे हे संशयास्पद आहे, असे रोहोतगी म्हणाले.

अभिप्राय द्या..