You are currently viewing जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम अधिकाऱ्यांना घेरावा..

जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम अधिकाऱ्यांना घेरावा..

सावंतवाडी /-

दोडामार्ग-बांदा रस्त्याबाबत वारंवार आंदोलने, निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत प्र. कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, अधिकारी विजय चव्हाण यांना धारेवर धरले. वर्क ऑर्डर नसताना आमदारांच्या उपस्थितीत नेमकी भुमिपुजन कसली केली असा सवालही करण्यात आला तर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर हलणार नसल्याचा इशारा दिला. भाजपच्यावतीने भाजप जिल्हा प्रवक्ते सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच अक्रम खान, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शेखर गांवकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, गुरूनाथ पेडणेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, मकरंद तोरसकर, अमित परब, मनोज सावंत, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..