You are currently viewing लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे विकासाला खीळ.;मोहन केळुसकर यांचा आरोप..

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे विकासाला खीळ.;मोहन केळुसकर यांचा आरोप..

कणकवली /-

सर्वंच पक्षिय राज्यकर्ते कोकणच्या पर्यटन विकासाची अनेक गाजरे कोकणवासियांना दाखवून भुलवून ठेवण्याचे काम इनामे इतबारे करीत असतात. मात्र जाहीर केलेल्या विकास कामांच्या पुर्तेतेबाबत बाबतीत सर्वंपक्षिय संघटित आवाज उठविताना कधीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोकणातील सर्वं प्रकारची विकास कामे कासवाच्या धिम्या गतीमुळे रडत रखडत चालू असल्याने खीळ बसली आहे. त्याला सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींचा पक्षिय द्दुष्टीकोनाचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, अशी टिका कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे. कोविआची कार्यकारिणीची बैठक नुकतीच दादर-मुंबई येथील कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष बळीराम परब, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, रमाकांत जाधव, चंद्रकांत आम्रे, सुनिल दळवी, नरेंद्र म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना केळुसकर यांनी मुंबई-नागपूर हा एक हजार कोटी रुपये खर्चाचा सम्रुध्दी महामार्ग अवघ्या तीन वर्षांत पुर्ण करण्यात आला, अशी माहिती देऊन ते म्हणाले, कोकण-मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठ-दहा वर्षे रखडत चालले आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्गाची मागणी आम्ही १९७८ पासून करीत आलो आहोत. पण खाडींवरील आठ पूले अद्यापपर्यंत बांधली गेली नाहीत. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे विकासाचा गतीरोधक ठरला आहे. अलिकडेच या पुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तो पुर्ण होण्यास आणखी किती वर्षें लागतील हे सांगता येत नाहीत. त्यातच आता राज्यकर्त्यांनी सागरी सम्रुध्दी महामार्गांचे गाजर दाखविले आहे. कोकण बोट आणि अंतर्गत जल वाहतूकीबाबत, तसेच चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर या नियोजित रेल्वे मार्ग, कोकण रेल्वेचे संपूर्ण दुपदरीकरण, मालवण येथील सी वर्ड प्रकल्प आदी पर्यटनद्धष्टया विकास प्रकल्पांबाबत कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी संघटितरित्या प्रयत्न करीत नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून केळुसकर म्हणाले, मात्र नाणार येथील प्रदुषणकारी पेट्रोकेमिकल्स रिफायनरी व्हावी म्हणून काहीनी स्वार्थापोटी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. मात्र कोकणाचे उपजत नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी सर्वंपक्षिय नेते अन्य प्रांतातील नेत्यांप्रमाणे एक दिलाने काम करण्यास पुढे येत नाहीत हेच कोकणवासियांचे दुर्दैव आहे.

अभिप्राय द्या..