You are currently viewing पर्यटन विकासासाठी विविध विभागांचा लाभ घ्या.;हनुमंत हेडे

पर्यटन विकासासाठी विविध विभागांचा लाभ घ्या.;हनुमंत हेडे

वेंगुर्ला /-

पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावात ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित पस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्र मोठे असल्याने कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनाने पर्यटन विकास विकसित करण्यासाठी विविध विभाग सुरु केलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक पर्यटन कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात पर्यटन संचालनालय उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय करु इच्छिणा-या व्यवसायीकांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा पार पडली. यावेळी पर्यटन प्रशिक्षण संचालक मनोज हाडवळे, निसर्ग पर्यटनचे प्रमुख समन्वयक तथा संचालक संजय नाईक, तालुका कृषी अधिकारी वर्षा गुंड, पर्यटन महासंघ उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला अध्यक्ष दिनानाथ वेर्णेकर यासह ७४ पर्यटक व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी भोगवे येथील महेश सामंत यांना कृषी पर्यटन केंद्र मंजुरीचे सर्टिफिकेटस देण्यात आले.

अभिप्राय द्या..