You are currently viewing कोरनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना प्रदान केला तीन लाख रुपयांचा धनादेश..

कोरनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना प्रदान केला तीन लाख रुपयांचा धनादेश..

सिंधुदुर्ग /-

औषध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मॅन काईंड फार्मा या कंपनीच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत पावलेल्या सिंधुदुर्ग पोलीस विभागातील पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना सामाजिक बांधिलकी जोपासत तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

देशातील औषध क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मॅन काइंड फार्मा हिने कोविड काळातील डॉक्टर, नर्स, पोलिस, फार्मसिस्ट यांच्यासाठी सीएसआर निधी मार्फत एक विशेष निधी राखीव ठेवला होता. त्यामार्फत सिंधुदुर्गातील पोलिस हवालदार कै. विद्याधर लोणे यांना मदत करण्यात आली. मालवण तालुक्यातील देवबाग येथे लोणे यांचे कोविड मुळे २६ मे २०२१ रोजी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला ३ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी चे विभागीय प्रमुख  महेश परशुराम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी योगेश वारंग, राजेश धुरी, परेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..