सावंतवाडी /-
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक समस्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीची सभा समिती प्रमुख नरेंद्र बिङये यांच्या उपस्थितीत पार पाङली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यात गट विकास स्तरावरुन ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या सेवा विषयक बाबींची पूर्तता न करणार्यां संबधितांवर कारवाई होणे आवश्यक असल्याने तालुकास्तरावर वर्षातून संघटना पदाधिकाऱ्यां समवेत प्रशासकीय बैठक घेणे बंधनकारक आहे, अशा ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक समस्या असुन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गट विकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला आहे, असे संघटनेचे कोअर कमिटीप्रमुख नरेंद्र बिङये यांनी सांगितले.