कणकवली /-

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. कणकवली नगरपंचायत ला ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्री गावकर व श्री घरत यांचे आभार व्यक्त केले. येत्या काळात कणकवली शहरातील व्यक्तीचा मृत्यू होईल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास उशीर असतील तर त्या मृताच्या नातेवाईकांना ही वातानुकूलित शवपेटी घरी नेण्यास देण्यात येणार आहे. व अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही शवपेटी पुन्हा नगरपंचायत जवळ उपलब्ध राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शवपेटी ची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शब्द दिला होता. शहरातील मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेह ठेवण्याकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेटी असल्याने अनेकदा ताटकळत राहावे लागते. यामुळे नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली शहराचे वाढते विस्तारीकरण व शहराची असलेली गरज या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही मागणी केली होती. या वेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष आण्णा कोदे, बंडू गांगण, राजू गवाणकर, उत्तम वाळके, संदीप राणे, रणजित घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page