You are currently viewing कुडाळमद्धे उद्या २२ ऑक्टोबर पासून नर्मदाआई महिला औद्योगिक संस्थेमार्फत “मी आत्मनिर्भर’ खरेदी मोहत्सवाचे आयोजन..

कुडाळमद्धे उद्या २२ ऑक्टोबर पासून नर्मदाआई महिला औद्योगिक संस्थेमार्फत “मी आत्मनिर्भर’ खरेदी मोहत्सवाचे आयोजन..

कुडाळ /-

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या. कुडाळ तर्फे “मी आत्मनिर्भर’ या टॅगलाईन खाली कोविड १९ कालावधीत महिला उद्योजकांना उपयुक्त प्लॅटफॉर्म देण्याच्या उद्देशाने दि. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त भव्य खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्था सचिव दीप्ती मोरे संचालक श्वेता कुडाळकर प्रज्ञा राणे उपस्थित होते यावेळी संस्थाध्यक्ष तेरसे म्हणाल्या, महिलांनी उद्योग व्यवसाय याद्वारे केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात येणार आहे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत महालक्ष्मी मंगल कार्यालय कुडाळ येथे प्रदर्शन भरवले जाणार आहे, महिला उद्योजिकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. तसेच त्यांना व्यवसाय व्यवस्थापन व विक्री कौशल्य याविषयीचे तज्ञ मार्गदर्शक द्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, नाबार्ड, केवायसी तसेच बँकांच्या योजना द्वारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यास मदत केली जाणार आहे. आत्मनिर्भर व मुद्रा लोन अंतर्गत अर्थपुरवठा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचे अधिकारी मार्गदर्शन करतील यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे पिके गावडे एम सी डी चे रामचंद्र गावडे स्टेट बँक कुळाचे कुराडे बँक ऑफ महाराष्ट्रचे कांबळे आदी अधिकारी या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू, रंगीत पणत्या, आकाशकंदील, उटणे, साड्या ड्रेस मटेरिअल्स आर्टिफिशियल ज्वेलरी असे आणि बरेच काही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अभिप्राय द्या..