You are currently viewing देवगड ( SBI ) स्टेट बँक शाखेचा उद्द्या होणार महाकर्ज मेळावा.;शाखा व्यवस्थापक यांची माहिती.

देवगड ( SBI ) स्टेट बँक शाखेचा उद्द्या होणार महाकर्ज मेळावा.;शाखा व्यवस्थापक यांची माहिती.

देवगड /-

भारतीय स्टेट बँकेच्या देवगड शाखेच्या आवारात २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६वा. यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे मार्गदर्शन स्टॉल असणार आहेत. तसेच यावेळी एसबीआय लाईफ, जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीवर मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे.या मेळाव्याला सर्व नोकरदार, उद्योजक, युवक- युवती, माfहला वर्ग, शेतकरी व ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या देवगड शाखेशी अथवा शाखेच्या (02364) 262211 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देवगड शाखा व्यवस्थापकांमार्फत करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..