You are currently viewing मारुती ओमनी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक.;अपघातात चौघे जखमी..

मारुती ओमनी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक.;अपघातात चौघे जखमी..

कणकवली /-

विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन (MH -01 – AH – 9346) आणि अल्टो के टेन (MH -07 -AB – 4560) कारची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात चौघे प्रवासी जखमी झाले आहेत. विजयदुर्ग कासार्डे रस्त्यावर दारुम येथे हा अपघात आज दुपारी घडला. अपघातात ओमनी व्हॅन मधील दोन प्रवासी जखमी झाले असून निर्मला दीपक समजीसकर, दीपक यशवंत समजीसकर, माधुरी दयानंद मेस्त्री, प्रथमेश दयानंद मेस्त्री अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान अपघातस्थळी एपीआय शेखर शिंदे, हवालदार वंजारे यांनी धाव घेतली.

अभिप्राय द्या..